डबल म्यूटेंट व्हायरसवरही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस प्रभावी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  भारत बायोटेकने निर्माण केलेली कोव्हॅक्सिन ही लस SARS-CoV-2 च्या अनेक व्हेरिएंट्सवर परिणामकारक आहे. ही डबल म्यूटेंट स्ट्रेन विरोधातही प्रभावी असल्याचं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटलंय.

 

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, कोव्हॅक्सिन लस डबल म्यूटेंट स्ट्रेनचा प्रभाव कमी करण्यासाठी एक उपयुक्त कोरोना लस आहे. त्याचबरोबर SARS-CoV-2 च्या अनेक व्हेरिएंट्सचा प्रभाव कमी करण्यात ही लस महत्वाची भूमिका बजावत आहे

 

 

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च  – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने SARS-CoV-2 व्हायरसचे अनेक व्हेरिएंट्स यशस्वीरित्या वेगळे केले आहेत. त्यात UK व्हेरिएंटचा B.1.1.7, ब्राझिल व्हेरिएंट B.1.1.28, साऊथ आफ्रीकन व्हेरिएंट B.1.351 चा समावेश आहे. त्यांनी  UK व्हेरिएंट विरोधात लढण्याची कोव्हॅक्सिनच्या क्षमतेचा अभ्यास केला. त्यानंतर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सांगितलं आहे की, कोव्हॅक्सिन लस व्हायरसच्या डबल म्यूटेंटचाही परिणाम कमी करण्यात सक्षम आहे.

Protected Content