शिवाजी महाराजांनीही मागितली होती माफी ! : सुधांशू त्रिवेदी बडबडले !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच भाजपचे मुख्य प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असतांनाच आता भाजपचे मुख्य प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचे आक्षेपार्ह विधान समोर आले आहे. आज तक या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्रिवेदी म्हणाले की, ‘राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो? ब्रिटीश संविधानाची शपथ तर नाही घेतली ना !’ असे ते म्हणाले. त्रिवेदी यांच्या या वक्तव्यानंतर संताप व्यक्त केला जात असून विरोधकांनी यावर जोरदार टीका केली आहे.

कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी ट्विटच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. ‘शिवाजी महाराजांची तुलना माफीवीर सावरकर यांच्याशी करून सुधांशू त्रिवेदींनी शिवरायांचा अवमान केला आहे. जोपर्यंत त्रिवेदी हे याप्रकरणी माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांचा सहभाग असलेल्या कोणत्याही चर्चेच्या कार्यक्रमात कॉंग्रेस पक्ष सहभाग घेणार नाही,’ असं ट्वीट पवन खेरा यांनी केलं आहे. तर विरोधी पक्षातून या वक्तव्याच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Protected Content