जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहर व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील काँग्रेस भवन येथे माजी पंतप्रधान ‘भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा युवक कॉन्रेस कार्यक्रम जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या उपस्थित राजीव गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली..
भारतरत्न स्व. राजीव गांधी यांनी देशासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत जिल्हा युवक कॉन्रेस कार्यक्रम जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे पुढे म्हणाले की, दूरसंचार व संगणक युगाची १९८५ मध्ये निर्मिती करून खरं डिजिटल इंडिया व स्टार्ट अप इंडिया याचे जनक आहेत. स्व. राजीव गांधी यांनी देशासाठी केलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल माहिती यांनी माहिती दिली. देशात कॉम्प्युटर क्रांतीचे जनक म्हणून राजीव गांधी यांनाच श्रेय जाते, २१ व्या शतकाच्या विचार करून राजीव गांधी व त्यांचे मित्र सॉम पित्रोदा यांनी मिळून देशात कॉम्प्युटर चा प्रसार केला. भारत हा तरुण देश आहे म्हणूनच राजीव गांधी यांनी युवकांना देशाच्या प्रति अजून जास्त जिम्मेदार बनवण्यासाठी मतदानाचा हक्क १८ या वर्षी करण्यात आला आदी समाजाभिमुख योजना राबविल्या. जळगाव शहर व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगर अध्यक्ष मुजीब पटेल, जाकीर बागवान, मनोज वाणी, मीरा सोनवणे, सुनील सुरवाडे, अरुण सपकाळे, अनिल वाणी, मोहन पाटील, नाना पाटील, कैलास पाटील, ललित वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.