प. वी. पाटील विद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता उपक्रम

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय जळगाव येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्या. रेखा पाटील यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी आपापल्या वर्गाची स्वच्छता केली त्यात त्यांनी आपापले वर्ग झाडून स्वच्छ केले तर आपले बेंच टेबल शाळेतील फलक शाळेतील बोर्ड या सर्वांची यावेळी स्वच्छता केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना यूट्यूब च्या माध्यमातून राष्ट्रसंत गाडगे महाराजांची चित्रफीत दाखविण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षिका धनश्री फालक तसेच सूर्यकांत पाटील यांनी केले. प्रसंगी सर्व  शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

Protected Content