अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरूणास अटक

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवत पळवून नेत विनयभंग करणाऱ्या तरूणास एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मोहाडी येथे बहिणीकडे राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन तरूणी आपल्या आईवडीलांसह राहते. त्यांच्या गल्लीत अमोल चंदन सोनवणे (वय-२३) हा तरूणही राहतो. गल्लीत राहत असल्याने दोघांची ओळख होती. दरम्यान, अमोलने मुलीला प्रपोज केले. आणि दोघांच्या भेटीगाठी होण्यास सुरूवात केली. १४ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अमोल याने अल्पवयीन मुलीला बोलवून प्रेमाचे आमिष दाखवत फुस लावून पळवून नेले. दरम्यान, दोघेजण रात्री एका शेतात थांबले. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अमोल याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग गेला होता. मध्यरात्री अमोल हा मुलीला सोडून घरी निघून आला होता. मुलीने सकाळी घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. पिडीतेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज दुपारी संशयित आरोपी अमोल सोनवणे याला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Protected Content