बिग ब्रेकींग : डॉन आतीक अहमद व त्याच्या भावाची हत्या

प्रयागराज-वृत्तसंस्था | कुख्यात डॉन आतीक अहमद हा त्याचा भाऊ असद याच्यासह मरण पावला असून काल रात्री उशीरा झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

प्रयागराजच्या कॉल्विन हॉस्पिटलला जात असताना अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. कॉल्विन हॉस्पिटलमधून निघत असताना तीन हल्लेखोरांना या त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. या तिन्ही हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद हे पोलिसांच्या ताब्यात होते. उमेश पाल यांच्या हत्या प्रकरणात त्याच्यासह कुटुंबियांना अटक करण्यात आली होती. तर त्याचा मुलगा आणि पत्नी हे मात्र या प्रकरणात फरार होते. काही दिवसांपूर्वीच त्याच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. तर काल रात्री या दोन्ही भावांवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला असून यात ते ठार झाले आहेत.

दरम्यान, या हत्याकांड प्रकरणात तीन तरूणांना अटक करण्यात आलेली आहे. रात्री उशीरा ते पत्रकार बनून आले होते. आतीक आणि त्याचा भाऊ हे पत्रकारांशी बोलत असतांनाच त्यांच्यावर अंधाधुंध गोळ्या झाडण्यात आल्या. यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोन्हींवर गोळ्या झाडल्यानंतर तिन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Protected Content