किशोर पाटील व अमोल शिंदेवर हल्लाबोल करत मविआचा एकत्रीत लढण्याचा निर्धार !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार किशोर पाटील आणि भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत महाविकास आघाडीने बाजार समितीत एकत्रीतपणे लढण्याची घोषणा केली आहे.

पाचोरा -भडगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक संदर्भात पाचोरा येथे दि.१५ एप्रिल शनिवार रोजी भडगावरोड वरील बोहरा फार्म हाऊसवर महाविकास आघाडी पॅनलच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आला. पॅनल प्रमुख माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वैशाली ताई सुर्यवंशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

व्यासपीठावर उबाठा सेनेचे पाचोरा तालुका संपर्क प्रमुख सुनील पाटील पीटीसी चेअरमन संजय वाघ, बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब देशमुख, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, मोहन पाटील, एन.सी.पाटील, जयवंत पाटील,रा.कॉ.महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, सौ.योजनाताई पाटील, उबाठा सेनेच्या सौ.तिलोत्तमा मौर्य,युवती जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे, खलिल देशमुख, रा.कॉ.जिल्हा उपाध्यक्ष, शालिग्राम मालकर, भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी ,श्याम भोसले,प्रशांत पवार, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, शेतकरी सेनेचे अरुण पाटील, रमेश बाफना,माजी उपजिल्हा प्रमुख ऍड.अभय पाटील, माजी जि.प.सदस्य दिपकसिंग राजपूत, उद्धव मराठे ,ललित वाघ, तालुकाप्रमुख शरद पाटील, रा.कॉं.तालुका अध्यक्ष विकास पाटील, रा.कॉं.शहराध्यक्ष अझहर खान,भूषण वाघ, ऍड. प्रवीण पाटील, ऍड.अविनाश सुतार, अशोक चौधरी, सुदाम वाघ, रेखा पाटील, ऍड.मनीषा पवार, प्रमिला सोमवंशी, सुप्रिया सोमवंशी यांची उपस्थिती होती.

मेळाव्यात उबाठा सेनेचे गणेश परदेशी,अरुण पाटील डॉ.उत्तम महाजन सचिन सोमवंशी यांनी मनोगतात आमदारांनी तीन वेळा सत्तेत राहूनही बाजार समितीवर असलेले कर्ज फेडसाठी केलेले दुर्लक्ष तसेच शिंदे परिवाराने सत्तेचा दुरुपयोग करून मार्केट कमिटीच्या करोडो रुपये किंमतीच्या जागा कवडीमोल भावात कश्या हडप केल्या यावर आमदार आणि सतीश शिंदे यांच्या गटावर घणाघाती टिका केली.

प्रदीप पवार यांनी मागील अनेक दशकातील दूरदृष्टीच्या सहकार महर्षी नेत्यांनी विकासाची प्रकल्प उभारली, शेतकर्‍यांच्या सोयी साठी मार्केट कमेट्या स्थापन केल्या.परंतु अलीकडच्या काळात भांडवलदार व श्रीमंत राजकारण्यांनी या संस्था स्वार्थापोटी कर्जबाजारी करून डबघाईला नेल्या, संस्थेचे कर्ज फेडण्यासाठी जमिनी विकल्या अशी टिका केली.

वैशालीताई सूर्यवंशी म्हणाल्या कि,मार्केट कमिटी म्हणजे त्रिसूत्री संगम आहे. संस्थेत शेतकरी, व्यापारी आणि संचालक यांच्यात समन्वय असला तर संस्था डबघाईला जात नाही.शेतकरी केंद्रबिंदू मानून संस्थेत शेतकरी हिताची कामे झाली पाहिजे, मतदारांनी महाविकास आघाडी पॅनलला एकहाती सत्ता दिल्यास भविष्यात शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी निर्मल सिड्स च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवू, शेतकरी आणि जनहित जोपासणारे स्व. आर. ओ. तात्यांचा हाच वारसा पुढे नेत आहे. मतदान करतांना भविष्याचा विचार करून मतदान करा अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.

माजी आमदार दिलीप वाघ म्हणाले कि, कोणत्याही निवडणूका लागल्या की सर्वच पक्ष माझ्या भूमीकेवर लक्ष केंद्रित करतात. मार्केट कमिटीच्या निवडणूक बाबत आमदार किशोर पाटील यांच्या सोबत जागा वाटपच्या समाधानकारक चर्चा न झाल्याने आमचे मार्ग वेगळे झाले. आणि कॉंगेस व उबाठा सेनेचे एकत्र येऊन मार्केटची निवडणूक लढवीत आहोत. आमच्या या निर्णयाचा दोन्ही तालुक्यातील मतदार जनतेतून स्वागत होत आहे. या पुढील सर्व निवडणूका आम्ही महाविकास आघाडीतून लढणार आहोत.

दिलीप वाघ पुढे म्हणाले की, आमदार किशोर आप्पा म्हणतात मी एक इंचही जागा विकू देणार नाही, आम्ही देखील म्हणतो की जागा विकल्या जाणार नाही. परंतु कोणत्याही प्रकारचा शेती व्यावसाय न करणारे मार्केटची निवडणूक लढविणारे भाजपचे शिंदे कोठेही म्हणत नाही की, आम्ही मार्केटची जागा विकत घेणार नाही. फक्त जागा विकत घेणारा असा हा शिंदे परिवार आहे. मार्केट कमिटी टिकवायची असेल आणि विकसित करण्यासाठी स्व. सहकार महर्षि सुपडू आण्णा पाटील, गुलाबराव पवार, के.एम बापू पाटील, ओंकार आप्पा वाघ, आर.ओ तात्या पाटील यांच्या शेतकरी हितांचे धोरणे पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडी पॅनलकडे एकहाती सत्ता देण्याचे आवाहन श्री. वाघ यांनी केले. या प्रसंगी पाचोरा-भडगाव तालुक्यातील बाजार समितीचे मतदार, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि उबाठा सेनेचे शेकडो कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

Protected Content