धरणगाव पालिकेच्या १०० कोटींच्या प्रकल्पांच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ

धरणगाव, प्रतिनिधी | धरणगाव नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात भूमिगत गटार व पाणीपुरवठा प्रकल्पांच्या सर्वेक्षणाचे कामाचा पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला असून शहरासह शहरालगतच्या नवीन वसाहती मध्ये भूमिगत गटारी तसेच पाणीपुरवठा पाइपलाइन यासाठी जवळपास १०० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

धरणगाव शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा तसेच शहरातील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा म्हणून भूमिगत गटार हे दोन प्रकल्प गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेले असल्याने पालकमंत्री तसेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून त्या कामांना सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

लातूर येथील वैष्णवी कन्सल्टन्सीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. धरणगाव शहरासह वाढीव वसाहतीसह प्रकल्पाच्या सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असून जवळपास १०० कोटी पर्यंतचा खर्च मंजुरीसाठी शासन दरबारी पाठवून पाणीपुरवठामंत्री ना गुलाबराव पाटील त्याच खात्याचे मंत्री असल्याने त्याचा तर फायदा होईलच परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये गुलाबराव पाटील यांनी विकास कामाचा दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होईल.

शहरातील पाणीपुरवठा सर्वेक्षण काम सुरू झाले असून भूमिगत गटार योजनेसाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येत आहे राज्यसरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयातर्फे ही योजने योजना राबवली जाणार आहे कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले.

पालिकेचे विस्तारित क्षेत्र १६३ चौरस किलोमीटर आहे या संपूर्ण परिसरात ही योजना राबवली जाणार आहे त्यासाठी लातूर येथील कँसल संस्थेच्या दोन अभियंत्यांनी शहरातील लोकसंख्या व भौगोलिक रचना आदींची माहिती घेऊन त्यावरून तयार आराखड्यानुसार संपूर्ण शहराचा मायक्रो सर्वे केला जाणार आहे.

सदर योजनेच्या अंतिम सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून या योजनेसाठी शहरात सातही दिवस पाणीपुरवठा असणे आवश्यक आहे आणि वितरण व्यवस्थाचा प्रश्न महत्त्वाचा सुटणार असल्याने धरणगावकरांची गेल्या कित्येक वर्षांची पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा आता मात्र संपणार असल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
योजना ही १६३ किलोमीटर प्लान होणार असून भूमिगत गटार अंदाजित रक्कम ३० कोटी, नवीन पाईपलाईन अंदाजित कोटी ४० कोटी शहरातील रिमिक्स रस्ते अंदाजे ३० कोटी धरणी नाला सुशोभीकरण तसेच सुसज्ज चार पाण्याच्या टाक्यांचा समावेश आहे.

सदर प्रकल्प शुभारंभ कार्यक्रमास पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा उपप्रमुख पी एम पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, गटनेते पप्पू भावे, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपतालुकाप्रमुख राजेंद्र ठाकरे, विभाग प्रमुख संजय चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, विजय महाजन, अजय चव्हाण, भागवत चौधरी, बापू पारेराव, नंदू पाटील, जितेंद्र धनगर, अहमद पठाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेना उपशहरप्रमुख रवींद्र जाधव, एडवोकेट शरद माळी, धीरेंद्र पूर्भे, कौसीक पटेल, हेमंत चौधरी, चेतन जाधव, पापा वाघरे ,विलास माळी, छोटू जाधव, सतीश बोरसे, नारायण महाजन, कमलेश बोरसे, विनोद मराठे, दीपक पाटील, महेंद्र चौधरी, गोपाल चौधरी, अरविंद चौधरी, अमोल चौधरी आदिंचे सहकार्य लाभले.

Protected Content