४ महिन्यांपासून सबसिडी थांबली ; ३२ हजार गॅस ग्राहक संतापले

रावेर, प्रतिनिधी । घरघुती भारतगॅस सिलिंडरची मागील चार महिन्यांपासुन सबसिडी मिळत नसल्याने ३२ हजार ९०० भारत गॅसच्या ग्राहकां मधून संताप व्यक्त होत आहे. लॉकडाउन लागल्या नंतर शासनाने मे महिन्या पासुन ग्राहकांना मिळनारी सबसिडी काहीही कारण नसतांना बंद केली आहे.

शासनाने गाजा-वाजा करीत गॅस कनेक्शन वाटप केले. महागाईचे चटके गरीब कुटुंबाना बसत आहेत. त्यात कोरोना व्हायरसच्या पादुर्भावमुळे अनेकांच्या हाता-काम नाही त्यात शासनाने भारतगॅस सिलेंडर वर मिळनारी सबसिडी बंद केल्याने गृहणीमधून संताप व्यक्त होत आहेत.

रावेर परीसरातील ग्राहकांना शेवटची सबसिडी एप्रील मध्ये मिळाली होती त्यावेळेस ७४४ रुपये किमत असलेल्या गॅस सिलेंडरवर शासना कडून १६० रुपये संबधित गॅस कनेक्शन धारकाच्या खात्यावर वर्ग केली होती त्यानंतर मे,एप्रिल, जून,जूलै महिन्याची सबसिडी शासनाने ग्राहकांना दिलीच नाही

रावेर परीसरात भारतगॅसचे ३२ हजार ९०० ग्राहक आहे. सद्या स्थिती एका गॅस सिलिंडरची किंमत ५९९ इतकी आहे. रेगुलर गॅस कनेक्शन धारकांना सबसिडी न मिळाल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

उज्वलाच्या ग्राहकांना मुक्त सिलेंडर
उज्वला ग्राहकांची संख्या ४९०० इतकी आहे तर कोरोना काळात यांना शासना कडून फक्त एप्रिल मे आणि जून महिन्याचे सिलेंडर फ्री भेटले आहे. तेही प्रत्येक महिन्याला एक तसेच पुढचे सिलेंडर न भरल्यास त्यांना सुध्दा पुढचे फ्री’चे सिलेंडर देण्यात येऊ नये असे गॅस एजन्सिला शासनाचे आदेश आहे.

Protected Content