आश्रम शाळेतील शिक्षक मध्यप्रदेशात शोधताय विद्यार्थी

123456789

 

रावेर प्रतिनिधी । आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थी मिळविण्यासाठी तालुक्यातील शिक्षकांना टार्गेट दिले जात असून, मध्यप्रदेशमध्ये भ्रमंती करण्यास सांगितले जात आहे. धूपी गावात असेच एक शिक्षक ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’च्या प्रतिनिधींना भेटल्यावर त्यांनी याबाबत पूर्ण आपबिती सांगितली.

याबाबत माहिती अशी की, येथील शासकीय आश्रम शाळेसह इतरही आश्रम शाळा आहेत. सुमारे 42 ते 45 वय वर्ष असलेला शिक्षक गावात जाऊन तेथील पालकांना त्यांचे मुले रावेर तालुक्यातील आश्रम शाळेत टाकण्यासाठी विनंती करत आहेत. विद्यार्थींच्या शोध घेत असतांना थकलेला शिक्षक गावामध्ये बसले होत. त्याचवेळी त्यांना प्रतिनिधींनी गाठले, त्यानंतर शिक्षकांने आश्रम शाळेत विद्यार्थीं नसल्यामुळे मध्यप्रदेशमधील मुलांचा शोध घेऊन त्यांना येथील आश्रम शाळेसाठी आले जात आहे. विद्यार्थींच्या शोधात संतापलेल्या शिक्षकांने आश्रम शाळेबद्दल सर्व गरड ओकायला सुरुवात केली. विद्यार्थी आणण्यासाठी मुख्यध्यापकांनी टार्गेट दिले आहे. कसे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणल्यावर आधार कार्ड, रहिवासी दाखले बनविले जातात. यावर सविस्त माहिती सांगून शेवटी शिक्षक म्हणाले, माझे नाव पेपरात छापु नका अन्यथा माझी नोकरी जाईल. माझे मुले उघड्यावर येतील, येवढे सांगून ते शिक्षक पुढच्या गावात निघुन गेले. त्यामुळे मध्य प्रदेश्यातील विद्यार्थी कागदो-पत्री महाराष्ट्राचे दाखवून शासनाची दिशाभूल करीत आहे. अश्या आश्रम शाळेची प्रकल्प विभागाकडून दखल घेण्याची मागणी केली जात आहे.

Protected Content