सावदा शहरासाठी २ कोटी ५५ लाखांचा निधी : एकनाथराव खडसेंचे प्रयत्न

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील सोमेश्‍वर नगरसह परिसरातील रस्त्यांच्या कामांसाठी विशेष रस्ता अनुदान योजनेतून २ कोटी ५५ लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पाठपुरावा केल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी दिली आहे.

 

 

या संदर्भातील वृत्त असे की, सावदा शहरातील सोमेश्‍वर नगर आणि या भागातील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे २ कोटी ५५ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय अर्थात जीआर दिनांक ८ जून रोजी जारी करण्यात आला आहे. हा निधी विशेष रस्ता अनुदान योजनेच्या अंतर्गत प्रदान करण्यात आला असूनयाची अंमलबजावणी सार्वजनीक बांधकाम खात्याच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे यात नमूद करण्यात आलेले आहे.

 

शहरातील सोमेश्‍वर नगर आणि परिसरात रस्त्यांची कामे करण्याची मागणी कधीपासूनच करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमिवर, सदर निधीतून या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण व कॉंक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हा निधी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मिळाला असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कुशल जावळे, गौरव वानखेडे व हरीसिंग परदेशी यांनी दिली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: