Home Cities धरणगाव भाजपने आता आमच्याशी कुस्ती खेळून दाखवावी- ना. गुलाबराव पाटील

भाजपने आता आमच्याशी कुस्ती खेळून दाखवावी- ना. गुलाबराव पाटील

0
64
gulabrav patil


gulabrav patil

नाशिक प्रतिनिधी । सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाची खिल्ली उडवत पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भाजपने आता आमच्याशी कुस्ती खेळून दाखवावी असे आव्हान दिले. ते आढावा बैठकीनंतर येथे पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक विभागीय शासकीय योजनांची आढावा बैठक झाली. यानंतर गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपच्या बंडखोरांसोबत कुस्ती खेळून आम्ही निवडून आलोय, भाजपने आता आमच्याशी कुस्ती खेळून दाखवावी. शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यांनी आताही प्रस्ताव दिला तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही. देर आए दुरुस्त आए, सुबह का भुला श्याम को आया, असं आम्ही समजू.फ या सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, हे सरकार किती दिवस चालेल याची काळजी त्यांनी करु नये. शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासून राममंदिराबरोबर आहे, अबू आझमींना काय सांगायचं ते उद्धव ठाकरे सांगतील. तसेच परत भाजपसोबत जावं की नाही हे उद्धव ठाकरेचं ठरवतील, असेही ते म्हणाले.


Protected Content

Play sound