काश्मीर मुद्दा सोडवणाऱ्याला नोबेल द्या: इम्रान खान

RDS 190301 Khan for Nobel Peace Prize resources1

कराची (वृत्तसंस्था) पाकिस्तानच्या संसदेमध्ये शनिवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नावाची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, सोमवारी इम्रान यांनीच ट्विटरवर नोबेल पुरस्कारासाठी पात्र नसल्याचे म्हटले आहे. तर काश्मीरचा मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात यावा, असे मत खुद्द इम्रान खान यांनीच मांडले आहे.

 

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना मायदेशात पाठवल्यानंतर इम्रान खान यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी पाकिस्तानात जोर धरू लागली आहे. त्यावर इम्रान यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यासंबंधी त्यांनी सोमवारी ट्विट केले आहे. नोबेल पुरस्कारासाठी मी पात्र नाही. काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार काश्मीर मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार द्यायला हवा. या मुद्द्यावर तोडगा निघाल्यास या क्षेत्रात शांतता नांदेल आणि विकास होईल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान,इम्रान खान यांचे ट्विट अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तानी संसदेमध्ये दोन्ही सभागृहात आज चर्चा होणार आहे.

Add Comment

Protected Content