महाविकास आघाडीवर टीका केली कि केंद्राकडून सुरक्षा ?

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्यातील नेतृत्वावर टीका केली कि विरोधकांना केंद्राकडून सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते. त्यामुळे टीका करणे हा सुरक्षेचा मार्गच झाला आहे, अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांच्यावर केली.

राज्यातील अनेक विरोधी राजकीय व्यक्तींकडून महाविकास आघाडीच्या मंत्री, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते. महाविकास आघाडीच्या विरोधकांनी टीका केली कि केंद्र सरकारकडून तात्काळ वाय सुरक्षा मिळते. या टीका योजनेचे अनेक लाभार्थी आहेत. यात अभिनेत्री कंगना राणावत, खा.नवनीत राणा, भाजपचे किरीट सोमय्या यांना केंद्राकडून सुरक्षा आहे. त्यात आता राज ठाकरे यांनादेखील सुरक्षा देण्यात येईल. अशी टीका विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना प्रसार माध्यमांशी बोलतांना केली.

नामांतराबाबत केंद्राची दुटप्पी भूमिका
शहरांचे नामांतर किंवा नावात बदल करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा असून दिल्लीमधील रस्त्याचे व हैद्राबादचे भाग्यनगर किंवा उत्तर प्रदेशातील अनेक शहरांचे नामांतर केले गेले.  उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यासाठी शिवसेनेकडून आतापर्यंत कित्येकवेळा ठराव केले गेले  आहेत.  मात्र महाराष्ट्राच्या बाबतीतच केंद्राची दुटप्पी भूमिका असून नामकरणाबाबत दुजाभाव केला जात असल्याची टीका नीलम गोऱ्हेंनी केली.

Protected Content