Home क्राईम Kidnapped : जळगावातून अल्पवयीन मुलाचे अपहरण

Kidnapped : जळगावातून अल्पवयीन मुलाचे अपहरण

0
108

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान नगरातून बारा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान नगर भागात देवेंद्र मनोज कोळी (वय-१२) हा त्याच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. रविवारी १७ एप्रिल सायंकाळी मुलगा घराबाहेर पडला सर्वत्र शोध घेवूनही मिळून आला नाही. तीन दिवस उलटूनही मुलगा मिळून न आल्याने देवेंद्र याची आई लक्ष्मी कोळी यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. मुलाला काही तरी आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा संशय तक्रारीत मुलाच्या आईने व्यक्त केला असून त्यावरुन बुधवारी एमआयडीसी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दिपक जगदाळे करीत आहेत.


Protected Content

Play sound