राज्यपाल आणि राज्य सरकारमधील मतभेदांमुळे संवादाचा अभाव

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील महत्वाचा दुवा मुख्यमंत्री, राज्य सरकार कोणत्याही पक्षाचे असो, मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यात राज्यातील घडामोडी, राजकीय सामाजिक शासकीय प्रशासकीय विविध प्रश्नांसंदर्भात सातत्याने गाठीभेटी तसेच चर्चा होत असतात. परंतु मविआ सरकार आणि राज्यपात यांच्यात मतभेदांमुळे या भेटी क्वचितच झाल्या आहेत. परिणामी निकोप संवादाच्या अभावामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

राज्याचे घटनात्मक पद राज्यपाल व राज्य सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री हि महत्वाची पदे आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी जून २०१९ मध्ये पदभार स्वीकारला, तर सप्टेंबर मध्ये निवडणुका होऊन पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. परन्तु केवळ दीड दिवसांचे ते मुख्यमंत्री ठरले. त्यानंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. हि मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्यपालांची पहिली भेट. १ जानेवारी २०२० च्या विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनप्रसंगी विधानभवन ६ डिसेंबर २०१९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणदिनानिमित्त राज्यपाल व मुख्यमंत्री यांचे चैत्यभूमीवर अभिवादन भेट. तर ३ जानेवारी २०२० रोजी राज्यपालानी मुख्यमंत्र्याच्या कुटुंबियांचे स्नेहभोजनाचे निमंत्रण स्वीकारत मातोश्री निवासस्थानवरील भेट, मध्यंतरी एकदोन भेटीनंतर मात्र राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात संवाद निर्माण करणाऱ्या सदिच्छा भेटी क्वचितच आहेत.

आताच्या विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात देखील राज्यपालांना गोंधळी आमदारांनी व्यत्यय आणल्यामुळे अभिभाषण आवरते घेत काढता पाय घ्यावा लागला. संवादापेक्षा मुख्यमंत्री ठाकरे यांची विधान परिषदेवरील नियुक्ती, विधान परिषदेवरील अन्य १२ सदस्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न, विद्यापीठाच्या कामात हस्तक्षेप, सरकारी विमानाचा वापरप्रसंगी अडवणूक, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, यांवरून राज्यपाल व राज्य सरकार यांच्यातील सुप्त संघर्षच उफाळून येत असल्याच्या चर्चा आहेत. १५ ऑगस्ट २६ जानेवारी, १ मे महाराष्ट्र दिन असे प्रशासकीय कार्यक्रम, मंत्रिमंडळ, लोकआयुक्तांचा शपथविधी, पंतप्रधान, राष्ट्रपती यांचे स्वागत तसेच मुख्यमंत्री पत्नी यांच्या वडिलांच्या निधनानंतर दिलेली सांत्वनपर भेट असे अपवाद वगळले तर मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या भेटी क्वचितच झाल्या असून त्यांच्यात मतभेदांमुळे  संवादाचा अभाव असल्याचेच दिसून आले आहे.

Protected Content