नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमरावतीतून भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने वैध ठरवला आहे. २०१९ साली झालेल्या निवडणूकीत त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध आहे असे आरोप करण्यात आले होते.

या प्रकरणी मुंबई हायकोर्टने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या बरोबरच हायकोर्टाने त्यांना दोन लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. परंतू या निर्णयाला सुप्रीम कोर्टात नवनीत राणा यांनी आव्हाण दिले होते. न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं याप्रकरणी निकाल दिला. ४ एप्रिल रोजी आज सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोठा दिलासा दिला आहे.

Protected Content