आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रासाठी प्रस्ताव सादर करा : ना. पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रशक्षिण देणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशक्षिण संस्था स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. अशा सूचना राज्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनलि पाटील यांनी येथे केल्या.

जळगाव प्रतिनिधी- जल्ह्यिात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रशक्षिण देणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशक्षिण संस्था स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. अशा सूचना राज्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनलि पाटील यांनी आज येथे केल्या.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन व संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्याच्या मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन विभागास पाठवण्यिात आला आहे. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विद्यापीठात मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, व्यवस्थापन समितीचे सदस्य अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधकिारी अंकीत,फैजपूर प्रांताधिकारी देवयानी यादव, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एस.टी.इंगळे, कुलसचविव डॉ. विनोद पाटील,वित्त व लेखा अधिकारी रविंद्र पाटील, सार्वजनकि बांधकाम वभिागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा नियोेजन अधकिारी विजय शिंदे आदी यावेळी उपस्थीत होते.

याप्रसंगी डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्रस्तावाचे सादरीकरण केले. विद्यापीठाच्या वतीने या संस्थेसाठी ३१ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.

Protected Content