Home क्राईम जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

0
62


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अयोध्या नगरातील साई पार्क परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला तीन जणांनी शिवीगाळ करत धारदार वस्तू डोक्यात मारल्याने गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवार ४ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता घडली आहे. या संदर्भात शुक्रवारी ५ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, चंद्रप्रकाश राजाराम यादव (वय-३७) रा.अयोध्या नगर, साई पार्क जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह राहतो. गुरुवार ४ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता चंद्रप्रकाश यादव हा तरुण घरी असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून याच परिसरात राहणारे शुभम परदेशी, जयेश परदेशी आणि सुनीता परदेशी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच धारदार वस्तूने डोक्यावर वार करून दुखापत केली. जखमी झालेल्या चंद्रप्रकाश यादव या तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेण्यात आले. त्यानंतर शुक्रवार ५ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणारे शुभम परदेशी, जयेश परदेशी आणि सुनीता परदेशी या तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.


Protected Content

Play sound