‘काका-पुतण्याची टोळी’ असा उल्लेख करत पडळकरांचा हल्लाबोल

पुणे प्रतिनिधी | जेजुरी मंदीर देवस्थानाच्या जमीनीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा संदर्भ घेऊन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काका-पुतण्याच्या टोळीने ‘मुळशी पॅटर्न’नुसार कब्जा केलेली जमीन मोकळी झाल्याबाबत आनंद व्यक्त करून पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे.

 

याबाबत वृत्त असे की, भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सतत सातत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर टीका करत असतात. या अनुषंगाने आता जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाचे आभार मानत त्यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केला आहे.

 

या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये पडळकर यांनी म्हटले आहे की, ”आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत, कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्न’द्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे.  ॥ यळकोट यळकोट जय मल्हार ॥”

 

 

खरं तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, मात्र त्यांच्या सातत्याच्या टीकेच्या रोख हा पवार कुटुंबीयांकडे आहे. त्यामुळे, यावेळीही त्यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे.

Protected Content