धक्कादायक : अत्याचार करून महिलेचा तिक्ष्ण हत्याराने खून; संशयिताला अटक !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिचा तीक्ष्ण हत्याऱ्याने खून केला. तसेच गिरणा नदी पात्रात वाळूच्या ढिकार्‍यात अर्धवट बुजून पुरावा नष्ट करण्याचा खळबळजनक प्रकार बुधवार ३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी संतोष धोंडू भिल रा. पिंपळवाड म्हाळसा ता. चाळीसगाव याला अटक करण्यात आले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मायाबाई संजय मोरे (वय-३५, रा. वरखेडे खुर्द ता. चाळीसगाव) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मायाबाई संजय मोरे वय-३५ या महिला आपल्या कुटुंबासह चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द येथे वास्तव्याला आहे. मंगळवार २ मार्च रोजी रात्री १० वाजता मायाबाई मोरे या कामानिमित्त बाहेर होत्या. त्यावेळी संशयित आरोपी संतोष धोंडू भिल याने महिलेवर अत्याचार करत तिक्ष्ण हत्याचाराने डोक्यावर, कानावर, डोळ्यावर, छातीवर वार करून जिवेठार केले. तसेच पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने त्याने मृतदेह नजीकच्या गिरणानदी पात्राच्या वाळूच्या ढिगारऱ्यात अर्धवट बुजून दिला. दरम्यान हा प्रकार दुसऱ्या दिवशी बुधवारी ३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह पथकाने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फॉरेनची मदतीने महिलेचा मृतदेह बाहेर काढून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. दरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी संतोष धोंडू भिल रा. पिंपळवाड म्हाळसा ता. चाळीसगाव याला अटक केली त्याने तपास खून केल्याची कबुली दिली.

याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात मयत महिलेचे जेठ सर्जेराव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संतोष भील यांच्या विरोधात सायंकाळी ६ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.

Protected Content