अहिरवाडीक्षेत्रात ९५ किलो सलई डिंक व मोटरसायकल जप्त; वनविभागाची कारवाई

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक व सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर (प्रा) यांच्या संयुक्त कार्यवाहीत अवैधरित्या दुचाकी वाहनाने डिंक वाहतुक करतांना कार्यवाहीत जप्त करण्यात आले आहे.

या संदर्भात वनविभागाच्या सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, ३ एप्रिल रोजी वन विभागास मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारावर परिमंडळ अहिरवाडी मधील नियतक्षेत्र पडले मधील कंम्पार्डमेंट क्रंमांक ०१/ ०३ मध्ये गस्त करीत असताना हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स एक मोटार सायकलव्दारे अवैधरित्या सलई डिंक वाहतूक करतांना मिळून आली त्यात साधारण ९५ किलो सलई डिंक जप्त केला असून सदरील आरोपी हा गाडी व गाडी वरील असेलला सलई डिंक माल फेकून अंधाराचा फायदा घेत पसार झाला पाठलाग केला असता मिळून आला नाही तरी सदरील वन गुन्हा हा वनरक्षक पडले खु यांच्या कडीक प्र.रि. क्रं ०२ /२०२४ दि.०३/०४/२९२४ नोंदविला असून सलई डिंक हा ९५ किलो असून त्याची किंमत १०४५० रुपये इतकी असून मोटर सायकल एक ची भाजरभाव अंदाजीत रक्कम ३६००० हजार रुपये आहे तरी सर्व मिळून रक्कम ४६४५० रुपये इतकी आहे.

सदरची कार्यवाही अजय नारायण बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, राजेंद्र सरदार वनपाल अहिरवाडी, वनरक्षक सुपडू सपकळे, वाहन चालक विनोद पाटील यांचा या कार्यवाहीत सहभाग होता. सदरची कार्यवाही ही यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख ,सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर वनगुन्हयाचा तपास अहिरवाडीचे वनपाल हे करीत आहे

Protected Content