Home राज्य साहित्य संमेलनात न जाण्याची, ब्राह्मण महासंघाकडून धमकी : महानोर यांचा आरोप

साहित्य संमेलनात न जाण्याची, ब्राह्मण महासंघाकडून धमकी : महानोर यांचा आरोप

0
106


na.dho . mahanor

मुंबई, वृत्तसंस्था | ‘साहित्य संमेलनात जाऊ नका’ अशी धमकी संमेलनाचे उद्घाटक ना.धो. महानोर यांना ब्राह्मण महासंघाने दिली आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी पत्र देऊन आपल्याला ही धमकी दिल्याची माहिती स्वतः महानोर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

 

याशिवाय आपणास विविध जिल्ह्यांमधून फोनवरून धमक्या देण्यात आल्या आहेत, असाही आरोप महानोर यांनी केला आहे. फ्रान्सिस दिब्रेटो यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, जी आम्हाला मान्य नाही असेही ब्राह्मण संघाने म्हटले आहे. तसेच यामुळेच तुम्हीही या साहित्य संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी मला देण्यात आली आहे. असेही महानोर यांनी म्हटले आहे.


Protected Content

Play sound