जळगाव कोविड केअर युनिटतर्फे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे सर्वेक्षण व वैद्यकीय तपासणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । अल्पसंख्यांक समाजातील ३३ संघटनांनी एकत्रित येऊन जळगाव कोविड केअर युनिटची स्थापना केली. युनिटद्वारे ५६ अल्पसंख्यांक डॉक्टरांच्या सहकार्याने जळगाव शहरातील वार्डात आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात जावून नागरिकांचे सर्वेक्षण व वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार देणारी ही एकमेव संघटना ठरली आजे. आजपर्यंत जळगाव शहरातील १० वार्डात व ग्रामीण भागातील पाळधी, नशिराबाद, चोपडा, नाचणखेडा व अडावद येथे प्रत्यक्ष जाऊन सुमारे ५८ हजार ३१२ लोकांचे सर्वेक्षण करून १० हजार १७७ लोकांची तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आले.

अडावद येथे शनिवारी झालेल्या सर्वेक्षण व आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन सरपंच भावना माळी, सपोनि योगेश तांदळे यांच्याहस्ते करण्यात आले. उपसरपंच अमीन मन्यार, आरोग्य अधिकारी डॉ.दायमा, ग्रा.पं.सदस्य जावेद खान, हमीद खान, भारती महाजन, अल्ताफ खान, ताहेर खान, यासह कोविड केअर युनिटचे प्रमुख प्रमुख मुफ्ती अतिकउर रहेमान, अध्यक्ष गफ्फार मलिक, जनसंपर्क प्रमुख फारुक शेख ,डॉक्टर जावेद शेख, आदींची उपस्थिती होती. व्यासपीठावर अडावदचे रियाज अली सय्यद, हाजी अब्दुल रहमान खान कुरेशी, हाजी कबीरोद्दीन दिलफिरोज, हाजी जहिरोद्दीन शेख हशम, फरीद मेम्बर ,हाजी अब्दुल रज्जाक मन्यार, व दिनू दादा देशमुख उत्पन्न बाजार समिती अडावद चे संचालक यांची उपस्थिती होती.

जळगावच्या डॉक्टरांनी दिली अडावदकरांना सेवा
डॉ. जावेद, रियाज बागवान, तौफिक शेख, आसीम खान, अब्दुल रहीम शेख, वसी अहमद, वसीम कुरेशी, जाकीर खान, अब्दुल वहाब, कामिल शेख, अमजद खान, वकार शेख, जावेद मुशीर खान, जहाआरा शेख, जीनत अमजद खान, गजा शफिकपूर रहमान, मुदस्सर शेख, अन्सार सिद्दिकी, रिजवान खाटीक या डॉक्टरांनी सेवा दिली.

कोविड केअर सेंटरचे कार्य
कोविड केअर सेंटर तर्फे या पंधरा वैद्यकीय शिबिरात सुमारे २ लाख रुपयाचे औषध उपचार मोफत रुग्णांना दिले आहे. तर कोरोनाबाबत जनजागृती केली. तसेच प्रत्येक वॉर्डातील व ग्रामीण भागातील जनरल प्रॅक्टिशनर यांना प्रत्यक्ष भेटून दवाखाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले.व कोरोना ची भीती मनातून निघाली त्यामुळे निश्चितच या पंधरा सर्वेक्षण व कॅम्पचे ठिकाण बघितले असता. त्या ठिकाणी कोरोनाची आकडेवारी अत्यंत कमी प्रमाणात झालेली आहे.

यांनी घेतले परिश्रम
हाजी जाहिरोद्दीन, अर्षद अली, रेहान मलिक, जमीर शेख, याकूब सेठ, शाफिक एम. आर, पप्पू तडवी, सचिन महाजन, अमजद खान, अमजद सिमेंट, अफसर केला, अमीन रजा, अब्दुल रझझ्याक, झिया उल हक, जावेद खान, शब्बीर शेख, अल्ताफ मेंबर, ताहेर मेंबर, इम्रान खान, रियाज मिस्त्री, हाजी हबीबोद्दीन, मोमीन एजाज, सादिक शेख, इम्रान शेख, इम्रान खान, सलीम खान.तर जळगावचे आमिर शेख, अर्षद शेख, इब्राहिम पिरजाडे, जफर शेख, अतिक शेख, हमजा शेख, हुजेफा शेख, मुशाहीद मानियार, फैझान अय्युब, फैझान शेख, अनिस शाह, झाकीर शेख, जुलकर नैन, अल्ताफ अलहिंद आदींनी परिश्रम घेतले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/802031307205769/

Protected Content