शहरातील थकबाकी असलेले मोबाईल टाॅवर सीलची कारवाई (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी  । प्रभाग समिती क्रमांक चार अंतर्गत वसुली पथकाने आज सर्वप्रथम  रामानंद नगर परिसरातील पोर्णिमा अपार्टमेंटमधील आयडिया टॉवर सील करण्यात आले.

भोगवटादार गिरीश विश्वनाथ महाजन,  रामानंद  नगर, गट नंबर १४७ मधील प्लॉट नंबर ३०  या इमारतीवरील मोबाईल टॉवर वर रक्कम रुपये ४ ,३०, ३१६  + अधिक शास्तीची रक्कम येणे बाकी असल्याने सदरचे टावरची इमारत सील करण्यात आले असून विद्युत विभागामार्फत वीज जोडणी बंद करण्यात आलेली आहे. दरम्यान अशाच कर थकविणाऱ्या शहरातील आणखी काही मोबाईल टावरर्सवर पुढील चार दिवसात सील करण्याची कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगिलते.   वसुली पथकात  संजय सपकाळे जयंत शेळके, नजीर शेख, शैलेश जगताप, कृष्णा भंगाळे, अशोक बारी, जितेंद्र सोनवणे अनंत जावळे, शिवदास सोनवणे यांच्या पथकाने कारवाई केली.

भाग १

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/956082901828571

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4098269820224453

Protected Content