Home क्राईम पायी घरी जाणार्‍या अल्पवयीन मुलीस पळविले

पायी घरी जाणार्‍या अल्पवयीन मुलीस पळविले

0
52

जळगाव प्रतिनिधी । आपल्या कुटुंबियांसोबत पायी घरी जाणार्‍या अल्पवयीन मुलीस एका दुचाकीस्वाराने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लॉकडाऊनमुळे अनेक जण आपापल्या घरी पायी निघालेली आहेत. असेच एक कुटुंब हे मुलूंड येथून अकोला जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी निघाले होते. काल सायंकाळी नशिराबाद येथे दुचाकीस्वाराने त्यातील अल्पवयीन मुलगी (वय १३) आणि तिच्या भावाला दुचाकीवरून भुसावळला सोडून देण्याचे सांगत आपल्या बाईकवर बसविले. यानंतर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ त्याने त्या मुलीच्या भावाला उतरवून दिले. पुढे पोलीस असल्याने तू पायी आम्हाला येऊन भेट असे सांगत त्याने संबंधीत मुलीस घेऊन गाडी पुढे नेली. दरम्यान, तो मुलगा पायी पुढे गेल्यानंतर त्याला दुचाकीस्वार गायब झालेला दिसला. यावरून नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Protected Content

Play sound