सातगाव येथे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात पाच बोकड ठार

पाचोरा प्रतिनिधी । सातगाव डोंगरी तालुका पाचोरा येथील उपसरपंच रज्जाक रमजान तडवी यांच्या शेतातील गोठ्यातील पाच बोकडांचा हिंस्त्र (वाघ) प्राण्याने गळा तोडून फडशा पाडल्याने पशुपालक भयभीत झाले आहे. 

उपसरपंच रमजान तडवी यांचे गावाच्या ५०० मीटर अंतरावर शेत असून शेतात शेळ्यांसाठी गोठा बांधलेला आहे. त्या गोठ्यात एकूण पाच शेळ्या पाच बोकड बांधलेले होते. नेहमीप्रमाणे रमजान तडवी व त्यांचा मुलगा दररोज रात्री झोपायला जात असत. मात्र सध्या अवकाळी पावसाने कहर केल्याने तडवी कुटुंब सोमवार २२ मार्च रोजी रात्रीला शेतात गेले नाही. गोठ्याला समोरून बांबूने विणलेल्या झोपाटी (दरवाजा)  असून सहसा कोणी आत प्रवेश करणार नाही अशी व्यवस्था आहे. मात्र हिंस्त्र प्राण्याने सदर बांबूचा दरवाजा दाताने तोडून आत प्रवेश केला. या दिवशी मात्र सदर शेतकरी किंवा नातेवाईक कोणी गोठ्यात झोपलेले नसल्याने बालबाल वाचले. एकाच वेळेस पाच बोकडांच्या गळ्याला पकडून रक्त पिण्याचा प्रकार घडला असावा. एक बोकड मात्र सदर हिंस्त्र  प्राण्याने पसार केला आहे. सदर शेतकरी सकाळी सात वाजता शेतात पोहोचले असता घडलेला प्रकार त्यांना दिसला. घडलेला प्रकार पाहून हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने गावात येऊन पोलीस पाटील दत्तू पाटील, सरपंच भरत राठोड, पशु वैद्यकीय डॉ. एस.जी. मडावी यांना घडलेली सगळी घटना सांगितली. सर्वांनी शेतात जाऊन पाहणी केली. डॉ. मडावी यांनी घटनेचा पंचनामा केला. सदर माहिती वन विभागाला कळविण्यात आली आहे.

Protected Content