जळगावातील आदर्शनगरात घरफोडी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हायप्रोफाईल आदर्शनगर परिसरातील रवीराज अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे १ लाख ७५ रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ येथे डीआरएम कार्यालयात कार्यरत असलेले अधिक्षक म्हणून असलेले कृष्णकांत विजय यावलकर रा. आदर्श नगरात घर आहे. कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पत्नी व मुलांसह भुसावळ येथील आईवडीलांकडे राहत आहेत. तेव्हा पासून त्यांचे घर बंद होते. अधून मधून ते आदर्शनगरातील घरी चक्कर मारत होते. बुधवारी कामानिमित्त जळगावला आले होते व सायंकाळी पुन्हा प्लॅटला कुलुप लावून भुसावळला निघून गेले. दरम्यान, गुरूवारी मध्यरात्री फ्लॅट बदं असल्याचे पाहून त्या घरात डल्ला मारला.

आजूबाजूच्या घरांना बाहेरून लावल्या कडी
चोरी करण्याआधी चोरट्यांनी अपार्टमेंटमध्ये आठ फ्लॅट आहेत. त्यातील सातही फ्लॅटच्या दरवाजांना बाहेरून कडी लावली होती. त्यानंतर कृष्णकांत यांच्या घरात चोरी केली. शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कृष्णकांत यांच्या फ्लॅटसमोरच राहत असलेले कुळकर्णी यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी त्वरित कृष्णकांत यांना संपर्क केला व चोरीची माहिती दिली. त्यात आपल्यासह इतर घरांना सुध्दा बाहेरील कडी लावली असल्याचे कुळकर्णी यांना कळले. त्यानंतर एका घरातील कुटूंबीयांनी त्यांच्या फ्लॅटच्या मागील बाजूच्या दरवाजांनी बाहेर येवून इतर फ्लॅटच्या दरवाजांची कडी उघडली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.

घरात पाहणी केली असता घरात सर्व सामान अस्तव्यस्त फेकण्यात आला होता. लहान मुलाचे प्रत्येकी ग्रँमच्या १२ सोन्याच्या अंगठ्या, प्रत्येकी २ ग्रँमच्या ६ सोन्याच्या अंगठ्या, लहान मुलाचे प्रत्येकी ४ ग्रॅमचे ४ सोन्याचे पदक तसेच प्रत्येकी २ ग्रॅमचे सोन्याचे पदक, चांदीचे कडे, तसेच सहा ते सात हजार रूपयांची रोकड असा सुमारे पाऊणे दोन लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content