धावत्या रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद ते माहिजी दरम्यान २२ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सागर गणेश खडसे (वय-२२) रा. दहीगाव संत ता. पाचोरा असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, सागर गणेश खडसे (वय-२२) रा. दहीगाव संत ता. पाचोरा या तरूणाने  म्हसावद ते माहेजी रेल्वे अपलाईन खंबा क्रमांक ३९४/११-१२ दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!