व्हिडीओकॉन कंपनी आता अग्रवाल यांच्या मालकीची !

नवी दिल्ली । कर्जामुळे धुत कुटुंबियांची मालकी असणारी व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज ही कंपनी आता अनिल अग्रवाल यांच्या ट्विन स्टार टेक्नॉलॉजी या कंपनीने खरेदी केली आहे.

व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजने स्टॉक मार्केटला पाठवलेल्या न्यायालयीन सूचनेत ही माहिती दिली आहे की, ठराव योजना आता विधी न्यायाधिकरणासमोर मान्यतेसाठी सादर केली जाईल. व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजच्या कमिटी ऑफ क्रेडीटर्स (सीओसी) किंवा कर्जदार समितीने ग्रुपच्या १३ समूह कंपन्यांसाठी ट्विन स्टार टेक्नॉलॉजीसच्या समाधान योजनेच्या (सोल्यूशन प्लॅन) बाजूने ९५ टक्के मतदान केले.

व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडवर बँकांचे ३१,००० कोटींचे सव्याज कर्ज आहे. यापूर्वी व्हिडिओकॉन गटाच्या १३ कंपन्यांना दिवाळखोरी प्रक्रियेमधून बाहेर काढता यावे, यासाठी व्हिडिओकॉनची स्थापना करणार्‍या धूत कुटुंबाने कर्जदारांना ३०,००० कोटी रुपये देण्याची ऑफर दिली होती. मात्र कर्ज देणार्‍या बँकांच्या समितीने वेदांत समूहाची ऑफर अमान्य केली. यामुळे आता व्हिडीओकॉनची मालकी अनिल अग्रवाल व त्यांच्या कुटुंबाकडे आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content