मोदी सरकारने क्रौयाची हद्द ओलांडली- राहूल गांधी यांची टीका

नवी दिल्ली वृत्तसंस्था । करनाल जिल्ह्यातील सिंघरा गावातील संत बाबा राम सिंह यांच्या आत्महत्येनंतर राहूल गांधी यांनी सरकारवर टीका करत मोदी सरकारने क्रौर्याची हद्द ओलांडली असल्याचा हल्लाबोल केला आहे.

संत बाबा रामसिंह यांच्या आत्महत्येवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. हरयाणाच्या एका संत बाबा राम सिंह यांनी शेतकर्‍यांची वाईट अवस्था पाहून आत्महत्या केली. या दुखा:च्या प्रसंगी मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. अनेक शेतकर्‍यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली आहे. मोदी सरकारने मात्र क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. हट्ट सोडा आणि तात्काळ शेती कायदा मागे घ्या, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं.

संत बाबा राम सिंह यांचे फक्त हरियाणा आणि पंजाबमध्येच नव्हे तर जगभरात कोट्यवधी अनुयायी आहेत. सिंघू बॉर्डरवर आंदोलनात सहभागी झालेल्या संत बाबा रामसिंह कर्नाल यांनी स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं. मला शेतकर्‍यांचं दुःख मला बघवत नाही आणि केंद्र सरकार काही करत नाही म्हणून आत्महत्या करीत आहे, असं सुसाइड नोटमध्ये त्यांनी लिहिलं आहे.

Protected Content