जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील विदगाव येथील हॉटेल तापी गार्डनमधील कॉऊंटरच्या ड्रावरमधून अज्ञात चोरट्यांनी २४ हजार ५०० रूपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ८ मे रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विदगाव येथे विवेकानंद मधूकर पाटील (वय-५२) रा. समर्थ कॉलनी, जळगाव याचे हॉटेल तापी गार्डन नावाचा ढाबा आहे. विवेकांनद पाटील यांनी नेहमीप्रमाणे ५ मे रोजी रात्री साडेदहा वाजता हॉटेल बंद करून घरी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या मागच्या बाजूल आलेल्या खिडकीतून आत प्रवेश केला. काऊंटरच्या ड्रावरमध्ये ठेवलेले २४ हजार ५०० रूपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार ६ जून रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. हॉटेल मालक विवेकानंद पाटील यांनी सोमवारी ८ मे रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे करीत आहे.