रेल्वे स्थानकाजवळ अत्यवस्थ पडलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील बॉम्बे हॉटेलजवळ अत्यवस्थ पडलेल्या प्रौढाचा देवकर रूग्णालयात उपचारादरम्यान गुरूवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील बॉम्बे हॉटेल जवळ राजेश मुखेर खाड (वय-४५, पुर्ण पत्ता माहित नाही) हे भिक मागून आपला उदरनिर्वाह करत होते. ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ वाजेच्या दरम्यान राजेश खाड हे अत्यवस्थ अवस्थेत पडून होते. शहर पोलीसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल विकास महाजन यांनी १०८ रूग्णवाहिकेने त्यांना गुलाबराव देवकर वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांचा अद्याप शोध लागला नाही. गुरूवारी १० डिसेंबर रोजी ११.३० वाजेच्या सुमारास रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोकॉ विकास पाटील करीत आहे.

Protected Content