जिल्ह्यात कापूस खरेदीस प्रारंभ ; रावेरला प्रतीक्षा कायम

 

रावेर, प्रतिनिधी ।जिल्हात सर्वत्र कापुस खरेदी केंद्र सुरु झालेली असतांना रावेरचे कापुस खरेदी केंद्र अद्यापही सुरु झालेले नाही. लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नांतून खरेदी केंद्र मंजूर असले तरी जीनिंग अभावी खरेदीला उशिर होत आहे. जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी इतर तालुक्यातील कापूस खरेदी प्रमाणेच रावेर कापूस खरेदीकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील ४३३ शेतक-यांनी कापुस विक्रीसाठी नंबर लावला असून अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतक-यांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे. याकडे खुद्द जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्राची खुद्द जिल्हाधिकारी राऊत जिल्ह्यात पाहणी करत असतांना रावेर कापुस खरेदी केंद्र अजून सुध्दा सुरु झाले नाही. आधीच लोकप्रतीनीधींच्या अथक प्रयत्नातून सीसीआयने रावेरला कापुस खरेदी करण्यात मंजूरी दिली होती. कापुस खरेदीसाठी जिनिंग उपलब्ध करून घेण्याची ऑनलाइन टेंडर भरण्याची मुदत संपली आहे. टेंडरच्या घोंघड मुळे शेतक-यांच्या कापुस खरेदीला उशीर होत आहे. लोकप्रतीधीनी सीसीआयला पुन्हा ऑनलाइन साईट ओपन करण्याची विनंती केली आहे. साईट सुरु झाल्यावर जीनिंग टेंडर भरल्यानंतर अधिकृतरीत्या कापुस खरेदी सुरु होईल तोपर्यंत तालुक्यातील शेतक-यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रावेर कापुस खरेदी केद्राला भेट देण्याची मागणी होत आहे.

Protected Content