वरणगांव फॅक्टरीची दुकाने अनधिकृत व्यक्तीच्या ताब्यात

 

भुसावळ : प्रतिनिधी । वरणगाव फॅक्टरीच्या  दुकानांचे भाडे करार करणारे वेगळे आणि प्रत्यक्षात दुकाने चालविणारे वेगळे ; असा प्रकार सुरु असल्याचा आरोप होत आहे

 

वरणगाव  आयुध निर्माणीतर्फे दुकाने भाडेतत्वावर चालविण्यासाठी टेंडर काढण्यात येते व यामध्ये जे लायसन्स धारक असतात अशांना टेंडर भरण्याचा अधिकार असतो. टेंडर उघडण्यास आल्यानंतर ज्या व्यक्तीला दुकान चालविण्यासाठी दिले जाते त्याच व्यक्तीला दुकान चालविणे अनिवार्य असते. परंतु वरणगांव फॅक्टरी वसाहतीमधील दुकान अनाधिकृत व्यक्ती चालवीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी केला आहे.

 

फॅक्टरी वसाहतीमधील पोस्ट ऑफिस रोडवरील दुकान गेल्या सहा महिन्यांपासून दुसरा अनधिकृत व्यक्ती चालवीत असल्याची माहिती संजय खन्ना यांना प्राप्त झाली आहे.

 

अनधिकृत दुकान चालकाबाबत चौकशी करून दुकान चालकास नोटीस देऊन दुकान सील करण्याची मागणी संजय खन्ना यांनी केली आहे.अनधिकृत दुकान चालकांचे पी.व्ही.आर व टेंडर घेतांना लागणारी कागदपत्र फॅक्टरीमध्ये जमा नसल्याने या अनधिकृत दुकान धारकांची आयुध निर्माणी वरणगावचे अधिकाऱ्यांनी चौकशी करणे गरजेचे आहे. अशा चुकीच्या कामांना आळा घालण्यासाठी वरणगाव पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता संजय खन्ना यांनीं केली आहे

Protected Content