औष्णिक वीज केंद्रात कोविड लसीकरण कॅम्प सुरु करा

 

भुसावळ, प्रतिनिधी ।  तालुक्यातील दीपनगर  महानिर्मिती औष्णिक वीज केंद्राचे  कर्मचारी, अधिकारी यांना कोविड -१९ लसीकरणासाठी वसाहती बाहेरील रुग्णालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुग्ण वाहिका तत्सम वाहन उपलब्ध करून द्या, लसीकरणानंतर आराम करण्यासाठी विशेष रजा मंजूर करणे किंवा कोविड-१९ वसाहतीत कॅम्प लावण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे  केली आहे.         

दीपनगर  महानिर्मिती औष्णिक वीज केंद्राचे वसाहतीत राहणारे कर्मचारी व अधिकारी यांना कोविड-१९ लस घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, वसाहतील कर्मचारी व अधिकारी यांना लसीकरणासाठी वरणगाव, तपत कोठारा येथील  रुग्णालयात जावे लागत आहे.   या रुग्णालयाचे अंतर जास्त असल्याने कर्मचारी, अधिकारी स्वतःचे वाहन घेऊन लस घेण्यासाठी जात असतात. लस घेतल्यानंतर अनेकांना थकवा येत आहे. अशा वेळी येतांना किंवा जातांना रस्ता अत्यंत खळबळ असल्याने अशा परीस्थितीत कर्मचारी, अधिकारी यांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याकडे रुग्ण वाहिका तथा स्कूल बस उपलब्ध आहेत. गटागटाने येथे नेण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. लस घेतल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचा त्रास जाणवत असल्याने दोन दिवसाची विशेष रजा मंजूर करण्यात यावी किंवा वसाहतीतील दवाखान्यात लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर केंद्रीय पदाधिकारी जे. एस. वराडे, झोन सचिव भरत पाटील यांची स्वाक्षरी आहे.

 

Protected Content