भुसावळात भाजपचे आंदोलन; सरकार विरोधात घोषणाबाजी (Video )

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । दूधाचा शासकीय भाव वाढवून मिळावा या मागणीसाठी आज येथील राष्ट्रीय महामार्गावर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सरकारच्या विरोधाच्या घोषणा देऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

adv final
WhatsApp Image 2020 08 11 at 2.57

राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर आज येथील भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी राज्य सरकारच्या निषेध करणार्‍या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजप जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक प्रा. सुनील नेवे,महायुतीचे पप्पभाऊ सुरळकर,भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,सरचिटणीस पवन बुंदेल,अमोल महाजन नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे,किशोर पाटील,गिरीश महाजन,अजय नागराणी,सतीश सपकाळे,राजेन्द्र चौधरी, महायुतीचे पदाधिकारी प्रा.प्रशांत पाटील,विशाल जंगले,राजु खरारे,नारायण रणधीर,माजी सभापती सुनील महाजन,संजय पाटील,माजी उपसभापती गोलु पाटील,ग्रामीण सरचिटणीस दिलीप कोळी,प्रमोद पाटील अर्जुन खरारे भाजप युवा मोर्चाचे अनिरुद्ध कुलकर्णी,चेतन बोरोले आणि महायुतीचे कार्यकर्ते बंधु उपस्थित होते. आदींसह अन्य नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

खालील व्हिडीओत पहा भुसावळच्या आंदोलनाची क्षणचित्रे

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!