जिल्हा एकता मराठा फाउंडेशनतर्फे स्त्री शक्तीचा सन्मान (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनतर्फे आप आपल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या पाच महिलांना राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या सत्कार सोहळ्यास महापौर सौ. भारती सोनवणे, कार्यक्रम अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जि. प. शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल, शंभू सोनवणे, प्रा. डॉ. सचिन पाटील, सुरेश पाटील, प्रा. गोपाल दर्जी, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कार्यक्रम अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा गौरव केला.

जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनतर्फे राज्य पत्रकार संघाच्या वतीने लोकमतचे निवासी संपादक यांना मिलंद कुलकर्णी यांना मूकनायक पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यांचा करण्यात आला सन्मान : मीना संजय मोरे (जळगाव),प्रतीक्षा विजय नेमाडे (जळगाव), मीरा देविदास मोरे(भुसावळ), शेख फिरदोस जमाल शफोयोद्दीन(जळगाव), सोनाली मधुकर साळुंके (चोपडा)

स्त्कार्थी शेख फिरदोस जमाल शफोयोद्दीन यांनी मनोगत व्यक्त केले.  प्रास्ताविक प्रा. डॉ. सचिन पाटील यांनी तर आभार प्रा. गोपाल दर्जी यांनी मानले. 

भाग १

https://www.facebook.com/508992935887325/videos/412577106721035

भाग २

https://www.facebook.com/508992935887325/videos/318755199464217

Protected Content