जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागात राष्ट्रीय युवा दिन साजरा; जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याहस्ते प्रतिमा पुजन

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन न्यायमुर्ती एस.डी. जगमलाणी यांच्याहस्ते आज करण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सभागृहात राष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस.डी. जगमलाणी  यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, युवकांनी आत्मनिर्भर होणे हि काळाची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी युवाकांचे विविध प्रकारे मनोबल वाढविण्याबाबत युवकांना योग्य ते मार्गदर्शन मिळणेबाबतची चित्रफित जिल्हा न्यायालयातील प्रवेश द्वारा जवळ करण्यात आली. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस डी जगमलाणी तसेच जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांनी स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेस माल्यार्पन करुन अभिवादन केले. सदर कार्यक्रमास जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक एल.एल.लोहार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अधिक्षक र. श्री. ठाकुर यांच्यासह न्यायालयातील कर्मचारी वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.

Protected Content