लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार- सपोनि परदेशी

पहूर, ता.जामनेर (रविंद्र लाठे)। कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने ३० जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर करवाई करण्याचा इशारा सपोनि राकेशसिंह यांनी दिला आहे. दरम्यान, उघड्यावर होणारी मांसविक्री सरपंचपती शंकर घोंगडे यांच्यासहकार्याने बंद करण्यात आलीत.

पहूर शहरातील बसस्थानकाच्या आवारात आज उघड्यावर मांस विक्री होत असल्याची माहिती सरपंच पती व पोलीसांनी मिळाली. त्यानुसार माहिती मिळताच मटन मार्केटमध्ये धाव घेवून पाहणी केली असता उघड्यावर मांस विक्री होतांना दिसून आले. लॉकडाऊनच्या काळाता मांस विक्रीस बंदी असल्याने पोलीस ठाण्याचे सपोनि राकेशसिंह परदेशी यांच्या मदतीने मांस विक्री बंद करण्यात आली.

पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेवून बेकायदेशीर होणारी मांस विक्री करण्यास मज्जाव केला. दरम्यान या पुढे कोणीही लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.

Protected Content