चाळीसगाव तालुक्यात आ. मंगेश चव्हाण यांच्यातर्फे ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषध वाटपास सुरूवात

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ ह्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधांचे वाटप करण्यात येत आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात कुटुंबांना १ लाख जणांना आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक औषध वाटप उपक्रमाला उंबरखेड-सायगाव जि.प.गटापासून सुरुवात करण्यात आली.

माजी मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेश चव्हाण यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व गावातील आशा वर्कर यांच्यामार्फत घरोघरी औषधी वाटप होणार असून त्याच्या सेवणाची पद्धत, पाळायची पथ्य याची माहिती दिली जाणार आहे. ६ जून शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन पर्वावर जिल्हा परिषदेच्या सायगाव – उंबरखेड गटातील प्रत्येक गावात भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, सरचिटणीस अमोल चव्हाण, युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, जितेंद्र पाटील, चेतन पाटील, सागर सूर्यवंशी, राम पाटील यांनी औषधी पोहचविण्यात आले आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, लॉकडाऊनच्या अडीच महिन्यांच्या काळात शिवनेरी फाऊंडेशन व भाजपा परिवाराच्या माध्यमातून आम्ही गरजूंना वेगवेगळ्या मार्गाने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये स्वत:ची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ही गोष्ट लक्षात घेवूनच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या ‘आर्सेनिक एल्बम-३०’ या भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने मान्यता दिलेल्या होमिओपॅथिक औषधाचे टप्याटप्याने वाटप करण्यात येणार आहे.

Protected Content