चाळीगावातील शिवजयंती उत्सवाच्या मार्गात बदल

chalisgaon1

चाळीसगाव । चाळीसगाव छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे साजरी होत असणारी जयंती शिवसेना पक्षामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी केली जाते. ती उद्या 23 मार्च रोजी असून चाळीसगाव शहरात दरवर्षी साजरा होणारा पिर मुसा कादरी बाबा उर्फ बामोशी बाबा यांचा उरूसही योगायोगाने याच काळात साजरा होत असून बाबांच्या तलवारीची मिरवणूक देखील 23 मार्च रोजी असल्याने दोघा मिरवणुकीचे मार्ग एकच असल्याने पोलिस प्रशासनावर व उत्सव समितीवर याचा मोठा ताण पडणार असून एकाच वेळेस दोघांही मिरवणूकीतील लोकांची गर्दी या रस्त्यावरून जाणे शक्य होणार नसल्याने आज पोलीस प्रशासनातर्फे बैठक घेण्यात आली.

या बैठकीत चाळीसगावचे पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी नजीर शेख, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, शिवसेनेचे जिल्हा उप समयव्यक महेंद्र पाटील, तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण, शहरप्रमुख नानाभाऊ कुमावत, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव नाना खलाने, दिनेश विसपुते, सुनील गायकवाड, शैलेंद्र सातपुते, निलेश गायके, रामेश्वर चौधरी यांची उपस्थिती होती. आज झालेल्या बैठकीत चाळीसगाव पोलिस स्थानकात समन्वय बैठक होऊन यात चाळीसगावच्या उत्सवाच्या दृष्टीने चर्चा होऊन शिवजयंती व तलवार हे दोघे उत्सव चाळीसगाव करांचे असल्याने दोघे उत्सव उत्साहात साजरे व्हावेत या दृष्टिकोनातून शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीच्या मार्गात यंदाच्या वर्षापुरता बदल करण्यात आला. रेल्वे स्टेशन पासून निघणारी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पाॅईंट चाळीसगाव पोलिस स्टेशन समोरून हॉटेल दयानंद हॉटेल सदानंद मार्गे प्रभात गल्ली अशी होऊन प्रभात गल्ली येथेच विसर्जन करण्यात येईल, असे आवाहन सर्व शिवप्रेमींना चाळीसगाव शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले. तर तमाम शिवप्रेमी नागरिकांनी या मिरवणुकीत सामील व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content