भुसावळात जेसीबीद्वारे नालासफाईच्या कामांना सुरूवात

भुसावळ प्रतिनिधी । पावसाळा सुरू होण्यापुर्वी शहरातील नालासफाईला मुहूर्त मिळाला नाही. माजी उपनगराध्यक्ष हाजी शफी पहेलवान यांनी पाठपुरावा केल्याने जेसीबीद्वारे नालेसफाईच्या कामांना प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली.

भुसावळ-येथे पावसाळ्‍यापुर्वी अवकाळी पावसाने ३ जुन रोजी दमदार हजेरी लावली होती. भुसावळ नगरपरिषदेला दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापुर्वी साफसफाईचे काम पुर्ण करण्यात येत होते. मात्र यावर्षी कोरोना संसर्गामुळे नालेसफाई करण्यास विलंब झाला होता. यामुळे खडकारोड भागातील नाला पुर्ण भरून रस्‍त्‍यावरून वाहू लागल्‍याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अखेर भुसावळ नगरपरिषदेच माजी उपनराध्‍यक्ष हाजी शफी पहेलवान यांनी पाठपुरावा केल्‍याने जेसीबीव्‍दारे नालेसफाईला सुरूवात झाली आहे. यावेळी माजी नगरसेवक संतोष बारसे आदी उपस्‍थित होते.

प्राथमिक स्तरावर नाले सफाई सुरू केली असून दुसऱ्या दिवशी ५ जेसीबी मशीनव्दारे खडका रोड, खाल्लम्मा दर्गा जवळ, गडकरी नगर, आगाखान वाडा, प्रल्हाद नगर, रेल्वे दगडीपूल ते मरीमाता मंदिर, वांजोळा रोड, तडीचा मळा, मरीमाता मंदिर, चैतन्य हॉस्पिटल, भोई नगर अश्या ११ भागात नाले सफाई करण्यात येणार असल्याचे माहिती नगर अभियंता पंकज पन्हाळे यांनी दिली.

Protected Content