रावेरात ग.स.सोसायटीतर्फे जेष्ठ सभासदांचा सत्कार

रावेर प्रतिनिधी । ग. स. सोसायटीतर्फे संस्थेच्या जेष्ठ सभासद सत्कार सोहळ्याचे आयोजन येथील स्वामी विवेकानंद शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ सभासदांचा सन्मान करण्यात आला.

रावेर तालुक्यातील 25 वर्षांपेक्षा जास्त काळ संस्थेचे सभासद असलेल्या 25 सभासदांचा पाच हजार रुपयांचा धनादेश व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. व्यसपीठावर ग.स. सोसायटीचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील, संचालक विलास नेरकर, तुकाराम बोरोले, सुरेश इंगळे,पंचायत समिती सदस्य प्रतिभा बोरोले , नायब तहसिलदार सी जी पवार यांच्यासह संचालक व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत येथील शाखेचे शाखाधिकारी दिलीप पाटील व सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक तुकाराम बोरोले यांनी तर सुत्रसंचालन विजय गोसावी, कैलास घोलाने यांनी  केले . शाखाधिकारी दिलीप पाटील यांनी आभार मानले.

Protected Content