यावल येथे कब्रस्तानच्या भिंतीला धोका : कारवाईची मागणी

a3c95ef4 5d47 4a62 82ae d4186d2ffdec

यावल (प्रतिनिधी) येथील पटेल समाज कब्रस्तानच्या (दफनभूमी) संरक्षण भिंतीच्या पुर्व आणी उतर भागाला लागुन काही लोकांनी अतिक्रमण केले आहे, तर काही मंडळींनी विटांच्या भटया उभारल्याने या संरक्षण भिंतीला धोका निर्माण झाला आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील हडकाई नदीच्या कडेला लागुन पटेल समाज बांधवांचे कब्रस्थान (दफनभुमी) असुन या कब्रस्तानाच्या चारही बाजुस संरक्षण भिंत बांधलेली आहे. यातील पुर्वे कडील बाजुस कब्रस्थानाच्या प्रवेशव्दाराजवळ काहींनी विटांची भट्टी लावली असून हे भट्टी लावतांना संबंधित भट्टी टाकणाऱ्यांनी संरक्षण भिंतींची माती खोदल्यांने भिंतीचा संपुर्ण भाग उघडा पडला आहे. ही भिंत कुठल्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असुन, या प्रश्नाकडे तत्काळ महसुल विभागाने लक्ष देवुन बेकाद्याशीर लावण्यात येत असलेल्या त्या विटभट्टी वाल्यांना नोटीस बजवावी व या भट्टीमुळे कब्रस्तानच्या भिंतीचे होणारे संभाव्य नुकसान टाळावे, अशी मागणी पटेल समाज कब्रस्तान देखरेख समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content