संदीप पाटील यांचे श्रीगोंदाच्या शाळेत १०-२० च्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षापर एक दिवशीय कार्यशाळा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रयत शिक्षण संस्था संचलित सरस्वती विद्यालय, विसापूर ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत परीक्षा व अभ्यासावर बोलू काही तसेच करिअर मार्गदर्शन या विषयावर संदीप निंबाजी पाटील यांनी मार्गदर्शनपर संवाद साधला.
शाळा, महाविद्यालय आणि युवक यांच्याशी करियर व शिक्षण विषयांवर मी महाराष्ट्रभर संवाद साधत असतो. मात्र सरस्वती विद्यालय विसापूर येथील ही एक दिवशीय कार्यशाळा माझ्यासाठी खास होती. कारण ज्या शाळेत मी शिकलो जिथे माझ्यावर संस्कार झाले. ज्या शिक्षकांनी मला मार्गदर्शन केलं, माझ्यात मूल्यवर्धन केले त्याच शाळेत मला वक्ता म्हणून आमंत्रित केले आणि माझ्याच लहान भावांना आणि बहिणींना मला मार्गदर्शन करता आले ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजेच १९९७ ला मी दहावी पास झालो आणि शाळा सोडून मी पुढच्या प्रवासास लागलो. परंतु अधून मधून शाळेत जाणे किंवा आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शाळेला पुस्तकांची किंवा इतर गोष्टींची मदत करणे तसेच शाळेत मुक्त लायब्ररी (अभ्यासिका) सुरू केली, वाटर प्युरिफायर सुद्धा लावून घेतले. आमचे ज्येष्ठ सीनियर विद्यार्थी वेळोवेळी या शाळेत उपक्रम घेत असतातच. या कार्यशाळेसाठी माझे सिनियर अजय क्षीरसागर यांचे विशेष प्रयत्न होते ते स्वतः मला मुंबई हून विसापुरला घेऊन आले व सर्व व्यवस्थापन व समन्वय केले.

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना आपली मानसिक स्थिती काय असली पाहिजे. फक्त गुणांचं दडपण न घेता परीक्षेला कसे सामोरे जावे उरलेल्या काळात अभ्यासाचे नियोजन कसे असावे याबाबतीत मुलांशी संवाद साधला. १० वी आणि १२ वी नंतर काय? करिअरच्या विविध वाटा देशातील सर्वोत्तम आणि दर्जेदार शैक्षणिक संस्था त्यांची प्रवेश परीक्षा व त्यांची अभ्यास पद्धती, विद्यार्थ्यांचा कल आणि त्या अनुषंगाने ध्येय निश्चिती या सर्व बाबतीत मुलांशी मुक्त संवाद साधला. मुलांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन देखील केले .

Protected Content