Home क्राईम बिलाखेड येथून अल्पवयीन मुलांना पळविले; गुन्हा दाखल

बिलाखेड येथून अल्पवयीन मुलांना पळविले; गुन्हा दाखल

0
42

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील बिलाखेड येथून १७ वर्षीय दोन अल्पवयीन मुलांना फुस लावून पळविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील बिलाखेड येथील रोहीत संजय पाटील (वय-१७) व शुभम बापू लोखंडे (वय-१७) रा. बिलाखेड ता. चाळीसगाव हे दोघेही २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २ ते ५ वाजताच्या सुमारास राहत्या घरातून दुचाकीवरून (क्र. एम.एच.१९ बीबी ५९८८) कुठेतरी निघून गेले आहेत. त्यावर घरच्यांनी परिसरासह नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली असता दोघेही मिळून आले नाही. म्हणून त्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहेत. संजय वामन पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.


Protected Content

Play sound