चाळीसगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाला मंजुरी

चाळीसगाव प्रतिनिधी | येथील रेल्वे स्थानकाजवळ संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती स्मारकाला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज पार पडली. यात शहरात रेल्वे स्टेशन जवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकास सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. यासोबत अलीकडेच चाळीसगाव येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आढळून आल्या असून तेथे ‘अ’ वर्गाचे स्मारक उभारण्याबाबत चा ठराव देखील आजच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी समता सैनिक दलाने नगरपालिकेकडे या दोन्ही मागण्या केल्या होत्या. याला आज मंजुरी देण्यात आल्याने समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागूल यांनी नगरपालिकेचे आभार मानले आहेत. या मागणीला पाठींबा देणारे खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, नगराध्यक्ष आशालता चव्हाण आणि उपनगराध्यक्षा आशा चव्हाण यांच्यासह सर्व नगरसेवकांचे बागूल यांनी आभार मानले आहेत.

Protected Content