सावदा येथील सीबीएसई दहावीच्या परीक्षेत देवेश महाजन प्रथम

सावदा प्रतिनिधी । येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे सीबीएसई दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून ९६ टक्के गुण मिळवत देवेश महाजन हा विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्‍तीर्ण झाला आहे. 

सावदा येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल यंदाही उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात स्कूलमधून द्वितीय हर्षदा किशोर कोल्हे ९३.४ टक्के, तृतीय श्रेया किरन खाचणे ९३.२ टक्के, चर्तुथ वरद पुंडलिक पाटील ९२.८ टक्के, पाचवा क्रमांक तनिषा मिलींद चौधरी ९२.६ टक्के, सहाव्या स्थानी केतकी दिनेश नेहते ९२ टक्के, सातवा क्रमांक मयुरी प्रशांत लोखंडे ९१.६ टक्के, आठव क्रमांक रेश्मा किशोर पाटील ९१.४ टक्के आणि नववा क्रमांक चिन्मय मनोज पाटील ह्या विद्यार्थ्याने ९०.८ टक्के गुण मिळविला आहे. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील, सचिव वर्षा पाटील, सदस्य डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, मुख्याध्यापिका भारती महाजन यांनी गुणवंताचे अभिनंदन करुन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिला आहेत.

 

Protected Content