जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १० हजाराच्या पार; आज २१४ रूग्णांना मिळाला डिस्चार्ज

जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यातील ३१२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सायंकाळी आलेल्या रिपोर्टवरून दिसून आले असून जिल्ह्यात एकुण बाधितांचा आकडा दहा हजाराच्या पार झाला आहे. तर आजच २१४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायमच असल्याचे दिसून आले आहे. आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ३१२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे आजच २१४ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ३१२ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ६३ रूग्ण हे जामनेर तालुक्यातील आहेत. याच्या खालोखाल चाळीगावमध्ये ४३; जळगाव शहर-४१तर चोपडा-२७ रूग्ण आढळून आले आहेत.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ-१०, अमळनेर-२५, पाचोरा-८, भडगाव-११, धरणगाव-१४, यावल-१०, एरंडोल-३, रावेर-१३, पारोळा-१७, मुक्ताईनगर-१३, बोदवड-१, इतर जिल्हे-३ असे एकुण ३१२ रूग्ण आज आढळून आले आहे.

तालुकानिहाय एकुण रूग्णसंख्या
जळगाव शहर- २५७१, जळगाव ग्रामीण-४५८, भुसावळ-८३०, अमळनरे-६५८, चोपडा-६९८, पाचोरा-३१६, भडगाव-३९५, धरणगाव-४४०, यावल-४२६, एरंडोल-४७१, जामनेर-६८७, रावेर-६५३, पारोळा-४५१, चाळीसगाव-४११, मुक्ताईनगर-३१८, बोदवड-२२४, इतर जिल्हे-३७ असे एकुण १० हजार ४४ रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ६ हजार ५०५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. बाधितांपैकी ३ हजार ७० रूग्ण उपचार घेत असून आजपर्यंत ४६९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content